माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख अपक्ष म्हणून खानापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार

Admin
By -
0

खानापूर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख अपक्ष म्हणून उद्या उमेदवारी दाखल करणार आहेत आज आटपाडीतील सूतगिरणीवर माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी बोलवलेल्या बैठकीस सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीत राजेंद्र अण्णा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल करावा व निवडणूक लढवावी अशा भावना कार्यकर्त्यांनी मांडल्या तर माजी आमदार राजेंद्र अण्णा यांचे बंधू व जिल्हा परिषदेचेे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी आपण भाजपबरोबर असल्याचे सांगून माणगंगा सहकारी साखर कारखाना आपण सुरू करणार असे सांगून अचानक निवडणूक लढवण्यासंदर्भात माजी आमदार राजेंद्र देशमुख यांच्या पक्षप्रवेशा बाबत व विधानसभा निवडणूक प्रक्रियेत आपणास बाजूस ठेवले असल्याचे खंत बोलून दाखवली त्यामुळे अमरसिंह देशमुख यांच्या भाषणाने राजकीय वातावरण गरम झाले त्यांनी सडेतोड राजकारणावर भाष्य केले या बैठकीला माजी सरपंच शिवाजीराव पाटील भाजपचे माजी अध्यक्ष बंडोपंत देशमुख आप्पासाहेब काळे बाग हनुमंतराव देशमुख उदयसिंह देशमुख यांच्यासह तालुक्यातील विविध पक्ष व संघटनेचे व देशमुख गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते माजी आमदार देशमुख यांनी आपण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरत असून तालुक्यातील कार्यकर्ते व जनता जो निर्णय चार दिवसात घेईल त्याप्रमाणे निवडणूक लढवायची का पाठिंबा द्यायचा हे ठरवले जाईल सांगितले.


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)