जत विधानसभा मतदारसंघातून आमदार गोपीचंद पडळकर यांना महायुतीतर्फे उमेदवारी.

Admin
By -
0

 

  जत विधानसभा मतदार संघातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे समर्थक कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला जत येथील जनसंपर्क कार्यालयात आमदार पडळकर यांना कार्यकर्त्याने पेढा भरवून आनंद व्यक्त केला कार्यकर्त्यांना फटाकेची आत्ताषबाजी केली भाजपने दुसरी उमेदवारी यादी आज जाहीर केली त्यामध्ये जत मधून भाजप तर्फे गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली जत मधून आमदार पडळकर यांना उमेदवारी देऊ नये म्हणून माजी आमदार विलासराव जगताप जिल्हा परिषदेचे माजी सभापती रवी तम गोंडा पाटील यांनी विरोध केला होता त्यामुळे जत विधानसभा मतदारसंघांमध्ये युतीतर्फे उमेदवारी देण्याबाबत तिढा निर्माण झाला होता परंतु पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ताकद लावून उमेदवारी मिळवली गेली दोन वर्ष जत मतदार संघामध्ये श्री पडळकर यांनी जनसंपर्क वाढवून जोरदार तयारी केली होती आरेवाडी येथे दसरा मेळाव्यात नेते मंडळींनी आमदार गोपीचंद पडळकर जत विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार अशी घोषणा करून त्यांच्याशी पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले होते परंतु जत येथे भाजप कार्यकर्त्यांनी भूमिपुत्राला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती तर विकास पुत्राला उमेदवारी देऊन या निवडणुकीत प्रचंड मताने विजय करण्याचे आव्हान पडळकर समर्थकांनी केले होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)