अमरसिंह देशमुख यांनी घेतली जयंत पाटलांची भेट

Admin
By -
0

 खानापूर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला तर त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी आज सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची भेट घेतली यावेळी आमदार मानसिंगराव नाईक माजी आमदार सदाशिवराव पाटील विटा चे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील युवक नेते प्रतीक पाटील यांची प्रमुख उपस्थित होते आटपाडी येथे सर्वपक्षीय बैठकीत माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल करावा निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली होती त्यावेळी अमरसिंह देशमुख यांनी भाषणात माणगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासंदर्भात जो आपणास मदत करेल त्यानंतर आपली निवडणुकीतील राजकीय भूमिका स्पष्ट करू असे आश्वासन बैठकीत दिले होते त्यांनी जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ नेते शरद पवार आदींची मी चर्चा करणार असे सांगितले होते त्याप्रमाणे त्यांनी आज जयंत पाटील यांची भेट घेतली त्यांनी भेटीला जाण्यापूर्वी सोशल मीडियावर भेटीत जाणार असल्याचे जाहीर केले होते त्यांची आज भेट झाली आपण भाजपमध्येच आहे मला माझ्या पार्टीने बाजूला काढले आहे अशी सडतोड भूमिका बैठकीत मांडून मला विश्वासात घेतली नाही असा जाहीरआरोप  केला होता मला आमदारकी पेक्षा माझ्या बापाने स्थापन केलेला साखर कारखाना सुरू करायचा आहे त्यास मदत करेल त्याचा या निवडणुकीत मी प्रचार करणार आहे अशी भूमिका अमरसिंह देशमुख यांनी घेतली होती याची राज्यभर मोठी चर्चा झाली राजकीय वातावरणही तापले गेले आहे जयंत पाटील यांच्या चर्चेचा खोलीबंद मधील माहिती मिळाल्यानंतर पुढील राजकीय निर्णय अपेक्षित आहे लोकशाही विकासाआघाडी कडून वैभव पाटील यांना उमेदवारी दिली आहे देशमुखांचा पाठिंबा मिळावा यासाठी वैभव दादा पाटील व माजी आमदार सदाशिवराव पाटील प्रयत्नशील आहेत 


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)