खानापूर विधानसभा मतदार संघात बंडखोरी शमवण्यासाठी कोण प्रयत्न करणार यावर निवडणुक लढतीचे चित्र अवलंबून आहे खानापूर मतदार संघात 30 उमेदवारांनी 37 अर्ज दाखल केलेआहेत या मतदारसंघातील महायुती व महाविकास आघाडी यांच्यामध्ये प्रमुख लढत अपेक्षित आहेे महा युतीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पक्षातर्फे सुहास बाबर यांनी उमेदवारी दिली आहेे तर महाविकास आघाडी तर्फे वैभव दादा पाटील यांना उमेदवारी दिली आहे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलाआहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केलेले माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला आहे त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक चुरशीने होणार असे सध्याचे चित्र आहे परंतु माजी आमदार राजेंद्र देशमुख व ब्रह्मानंद पडळकर यांची बंडखोरी कोण शमवणार यावरच महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवाराचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे आटपाडी तालुक्यातून महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पार्टीतर्फे उमाजी चव्हाण यांची उमेदवारी आहे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राजेश रामचंद्र जाधव यांना उमेदवारी दिली आहे तसेच बळीराजा संघटनेतर्फे डॉक्टर उन्मेश गणपतराव देशमुख अपक्ष म्हणून मोहन सोनू बागल गणेश तुकाराम जुगदर संतोष हेगडे ,संभाजी शेठ पाटील प्रकाश शेठ गायकवाड आटपाडी तालुक्यातील एकूण दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे चार दिवस उमेदवारी माघारी घेण्यासाठी मुदत आहे खानापूर मतदारसंघातील राजकीय पेच सोडवण्याची जबाबदारी आमदार गोपीचंद पडळकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाजपचे निवडणूक प्रमुख अमरसिंह देशमुख यांच्यावर असणार आहे गोपीचंद पडळकर यांना भाजप तर्फे जत विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे त्यामुळे त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यामध्ये लक्ष घालावे लागणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनाही खानापूर मतदारसंघातील बंडखोऱ्या शमविण्यासाठी विशेष लक्ष द्यावे लागणार आहे बहुजन समाज पार्टी जिल्हाध्यक्ष संतोष हेगडे यांनीही बंडखोरी केली आहे त्यांनी अपक्ष उमेदवारी भरली आहे आटपाडी तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रीय समाज पार्टी या दोन पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत एकंदरीत येत्या चार दिवसात होणाऱ्या राजकीय हालचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे खानापूर विधानसभा मतदारसंघातून कै माजी आमदार अनिल रावजी बाबर यांनी प्रतिनिधित्व केले होते त्यामुळे हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला महायुतीने दिला आहे तर महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाला उमेदवारी दिली आहे त्यामुळे या मतदारसंघात प्रमुख लढत दोघांमध्ये अपेक्षित आहे परंतु बंडखोरी शमवण्यासाठी नेते मंडळींना यश न आल्यास बहुरंगी लढत होईल प्रहार जनशक्ती पक्षातर्फे भक्तराज ठिगळे जनहित लोकशाही पार्टी नारायण खरजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संदीप लोंढे रिपब्लिकन बहुजन सेना प्रल्हाद गुजले वंचित बहुजन आघाडी ,संग्राम माने यांच्या पक्षासह अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात प्रत्यक्षात कोण कोण लढत देते याचे चित्र लवकर स्पष्ट होईल
खानापूर विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी कोण रोखणार
By -
October 30, 2024
0
Post a Comment
0Comments