आटपाडीची उत्तरेश्वर देवस्थानची यात्रा 14 नोव्हेंबर पासून

Admin
By -
0


आटपाडी चे ग्रामदैवत उत्तरेश्वर देवस्थानची कार्तिकी यात्रा 14 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे ही यात्रा 21 नोव्हेंबर पण चालणार आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा शेळ्या मेंढ्यांचा खिलार जनावरांची यात्रा माण देशातील आटपाडी येथे भरते आटपाडीच्या यात्रेपासूनच महाराष्ट्रातील सर्व यात्रा सुरू होतात 14 व 15 नोव्हेंबर रोजी शेळ्या मेंढ्यांची खरेदी-विक्री यात्रेत होणार आहे या यात्रेची तयारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव हजारे उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष राजेंद्र अण्णा देशमुख व व्यापारी करीत आहेत16 नोव्हेंबर पासून माणदेशातील जातिवंत खिलार जनावरांचा बाजार भरणार आहे 21 नोव्हेंबर रोजी उत्तरेश्वर देवस्थानचा रथोत्सव होईल दरवर्षी कार्तिक पौर्णिमेपासून आटपाडी यात्रा भरवण्याची प्रथा आहे शुक्र ओढा परिसरात विविध स्टॉल मांडलेजाणार आहेत त्याची जागावाटप नगरपंचायत तर्फे सुरू आहे दोन दिवस चालणाऱ्या शेळ्या मेंढ्यांच्या बाजारातून खरेदी विक्रीचे व्यवहारातून लाखो रुपयाची उलाढाल होत असते महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र गोवा भागातील व्यापारी शेळ्या मेंढ्याच्या खरेदीसाठी येत असतात महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे बारामती माण या भागातील हौशी मेंढपाळ या यात्रेला दरवर्षी उत्साहाने हजेरी लावतात आटपाडी येथे बाजार चौकात उत्तरेश्वर देवस्थानचे प्राचीन मंदिर आहे यात्रा देवस्थान ची यात्रा दरवर्षी भरवली जात आहे विधानसभा निवडणूक असल्यामुळे यात्रेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत यात्रा व्यवस्थित पार पडावी यासाठी देवस्थान ट्रस्ट कृषी उत्पन्न बाजार समिती नगरपंचायत पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)