आटपाडी तालुक्यातील नेते मंडळींनी केल्या राजकीय भूमिका स्पष्ट

Admin
By -
0

 खानापूर विधानसभा निवडणुकीतील रंगत वाढली आहे आरोप प्रत्यारोपच्या फेरी सभातून सुरू आहेत आटपाडी तालुक्यातील विविध पक्षाच्या नेते मंडळीच्या भूमिका स्पष्ट झाले आहेत खानापूर विधानसभा मतदारसंघातून प्रमुख तीन उमेदवारांमध्ये लढत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्य पक्षाचे  उमेदवार सुहास भैया बाबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार वैभव दादा पाटील आणि अपक्ष उमेदवार माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांच्यामध्ये निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली  म तदार संघातून 14 उमेदवार रिंगणात असले तरी तीन उमेदवारांमध्येच जोरदार राजकीय प्रचार सभा बैठका यांना जोर आला आहे आटपाडी तालुक्यातील भाजप शिवसेना उद्धव ठाकरे गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रीय समाज पक्ष रिपब्लिकन आठवले गट काँग्रेस बहुजन समाज पार्टी नेते असले या निवडणुकीत सोयीचे राजकारण करीत पक्षनिष्ठेपेक्षा स्थानिक राजकारणा अधिक राजकीय महत्व देऊन पक्षाचे अध्यक्ष व नेते मंडळींनी उमेदवारांना पाठिंबा दिला आहे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी करगणी येथे कार्यकर्ते समर्थक सभा घेऊन अपक्ष उमेदवार माजी आमदार राजेंद्र अण्णा यांच्या उमेदवार ला  तीव्र विरोध करत देशमुख बंधू वर कडाडून टिका केली आणि दोन दिवसात कुणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय घेतला जाईल असे सांगितले काँग्रेसचे नेते जयदीप भोसले यांनी शिवसेनेचे सुहास भैया बाबर यांना पाठिंबा दिला उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे तालुका अध्यक्ष बापूराव मगर यांनी सुहास बाबर यांना पाठिंबा दिला त्यामुळे बापूराव मगर व त्यांच्या कार्यकर्त्यांची जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी पक्षातून हकालपट्टी केली राष्ट्रवादी शरद पवार गट तालुका अध्यक्ष आनंदराव पाटील व सावित्रीबाई उद्योग समूहाचे नेते जयंत पाटील समर्थक भारत पाटील व रिपब्लिक पक्षाच अरुण वाघमारे यांच्या समर्थ कार्यकर्त्यांनी अपक्ष माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांना पाठिंबा देऊन प्रचारात सहभाग घेतला रिपब्लिकन पार्टी रामदास आठवले गट जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी सुहास बाबर यांना पाठिंबा दिला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी सुहास बाबर यांच्या निवडणुकीची तालुक्यातील धुरा सांभाळली आहे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी आपले बंधू राजेंद्र अण्णा यांच्या प्रचारात हिरारीने सहभाग घेतला आहे एकंदरीत तालुक्यात पक्षनिष्ठेपेक्षा आपल्या सोयीच्या राजकारणाचे निर्णय घेऊन नेते मंडळी प्रचारात उतरली आहे आता दोन दिवसात होणाऱ्या जाहीर सभेकडे व स्टार प्रचारक नेत्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत बहुजन समाज पार्टी प्रकाश खंदारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजेश रामचंद्र जाधव राष्ट्रीय समाज पार्टीचे उमाजी चव्हाण यांच्यासह आटपाडी तालुक्यातील उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत त्यांचाही प्रचार त्यांच्या पद्धतीने सुरू आहे आटपाडी तालुक्यातील बहुतांश नेते मंडळींनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या राजकीय भूमिका स्पष्ट केल्या त्यामुळे या निवडणुकीत पक्षनिष्ठा तत्वनिष्ठा यांना तिलांजली दिली आहे

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)