अमरसिंह देशमुख यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट खानापूर विधानसभा मतदारसंघातील महा युतीचे उमेदवार सुहास बाबर यांना देशमुख यांना निवडणुकीत पाठिंबा द्यावा यासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर यांनी महायुतीच्या दोन नेत्यांची भेट घडवून आणली त्यामुळे आता दोन दिवसात अमरसिंह देशमुख कुठला राजकीय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी खानापूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्याने तालुक्यात चारही जिल्हा परिषद गटात जनसंपर्क दौरा आयोजित केला आहे तर गेली दोन दिवस अमरसिंह देशमुख यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे मानगंगा साखर कारखाना सुरू करण्यास व ताब्यात देण्यास मदत करणाऱ्या नेत्यांच्या आश्वासनावर आपला राजकीय निर्णय जाहीर करणार आहेत महाविकास आघाडीचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेसे शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची प्रथम भेट घेतली यावेळी माजी आमदार सदाशिव पाटील व उमेदवार वैभव दादा पाटील उपस्थित होते त्यानंतर शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमोल बाबर यांच्यासोबत अमरसिंह देशमुख यांनी भेट घेतली परंतु दोन दिवस झाले अमरसिंह देशमुख यांनी भेटीचा तपशील जाहीर केला नाही तर माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी आपण निवडणूक लढवणार असा पवित्रा घेतल्यामुळे कार्यकर्ते नेते मंडळी यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीस तर देशमुख जाणार नाहीत ना अशी चर्चा सुरू आहे
Post a Comment
0Comments