खानापूर विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी आटपाडी तालुक्यात जनसंपर्क दौर तीन दिवस
सुरू केला आहे त्यास चांगला प्रतिसाद मिळाला आटपाडी दिघंची या दोन जिल्हा परिषद गटातील गावोगावच्या कार्यकर्त्याच्या बैठका पूर्ण झाल्या हलगीच्या तालावर गावोगावात त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे महिला त्यांना औक्षण करत आहेत सत्कार होत आहे आज त्यांचा करगणी जिल्हा परिषद गटात संपर्क दौरा सुरू झालाय काल मनमंदिर उद्योग समूहाचे अशोकराव गायकवाड यांनी संपर्क दौऱ्यातच भेट घेतली त्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत जनपसंपर्क दौरा सुर असतो माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख प्रत्येक गावात कार्यकर्त्यासह जात आहेत आपली विधानसभा निवडणुकीतील भूमिका स्पष्ट करत आहेत कार्यकर्तेही आपल्या भावना व्यक्त करत आहेत देशमुख यांच्या जनसंपर्कदौऱ्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे अण्णांनी निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्ते धरत आहेत देशमुख गटाच्या नेते व कार्यकर्ते त्यामुळे रिचार्ज झाले आहेत त्याचा राजकीय परिणाम खानापूर तालुक्यातील उमेदवारावर होण्याची राजकीय चर्चा सुरू आहे
Post a Comment
0Comments