आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत
भरडधान्य मका खरेदी नोंदणीची 31 डिसेंबर मुदत
सांगली जिल्ह्यात खरीप पणन हंगाम 2024-2025 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरडधान्य मका खरेदी तयारी करीता शासन निर्णयातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांची BeaM पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता दिनांक 10 ऑक्टोबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 अखेर पर्यंत केंद्र शासनाकडून मुदत देण्यात आली आहे. चालु हंगामात मका पिकासाठी 2 हजार 225 रूपये आधारभूत किंमत जाहीर झाली असून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ होण्यासाठी मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी गजानन मगरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
नोंदणीसाठी चालु हंगामातील पीक पेरा ऑनलाईन नोंद असलेला सातबारा उतारा, बँक खात्याच्या पासबुकची साक्षांकित प्रत, आधारकार्ड प्रत तसेच शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक इ. कागदपत्रासह शेतकऱ्यांनी स्वतः हजर राहून पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी दरम्यान लाईव्ह फोटो अपलोड करावयाचा आहे. मका खरेदी करीता कालावधी दि. 01 डिसेंबर 2024 ते 31 मार्च 2025 असा आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या मंजुरीनुसार जिल्ह्यात विष्णु आण्णा ख.वि. संघ, सांगली/जत, कवठेमहांकाळ तालुका ख.वि. संघ, कवठेमहांकाळ, अॅड. आर आर पाटील शेतकरी सह ख.वि. संघ, तासगाव, खानापुर तालुका ख.वि.संघ, खानापुर, कृषी उत्पन्न बाजार समिती, आटपाडी या सहा खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असल्याचे श्री. मगरे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
Post a Comment
0Comments