आटपाडी लिंगायत धर्म बचाव समिती सांगली जिल्हा यांच्या वतीने आटपाडी तालुक्यातील वीरशैव लिंगायत समाजातील सर्व जाती पोट जाती( लिंगायत कुंभार, लिंगायत माळी, लिंगायत तेली, लिंगायत कोष्टी) तील समाज बांधव महिला भगिनी वधु वरपरिचय मेळावा होणार आहे दिनांक ३१ डिसेंबर २०२४ सकाळी ठीक११:०० वाजता जवळे मल्टीपर्पज हॉल आटपाडी या ठिकाणी महात्मा बसवेश्वर समाजभूषण, उद्योग रत्न व सहकार भूषण पुरस्कार वितरण भव्य सत्कार सोहळा व दिनदर्शिका २०२५ प्रकाशन वधू-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमासाठी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी या कार्यक्रमासाठी आपले गुरुवर्य श्री श्री श्री १०८ सद्गुरु डॉक्टर नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज, श्री श्री श्री १०८ रुद्र पशुपती कोळेकर महाराज नूतन मठाधिपती, श्री श्री श्री १०८ प्रभुदेव शिवाचार्य माढेकर महाराज, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तसेच या कार्यक्रमासाठी मा आमदार विनयरावजी कोरे शाहुवाडी पन्हाळा, मा आमदार श्री विजयरावजी देशमुख दक्षिण सोलापूर, उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमांमध्ये आपल्या आटपाडी तील जवळे मल्टीपर्पज हॉल व जवळे ज्वेलर्स चे मालक श्री भारत (आप्पा) जवळे यांना महात्मा बसवेश्वर उद्योग रत्न पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे तसेच इतर तालुक्यातील मान्यवरांचे अन्य पुरस्कार वितरण हि या कार्यक्रमात होणार आहेत तरी या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून उपस्थित रहावे ही कार्यक्रम संयोजक . भक्तराज ठिगळे, अध्यक्ष लिंगायत धर्म बचाव समिती श्सगम डोंबे अध्यक्ष, लिंगायत समाज आटपाडी व सर्व समिती सदस्य. यांनी केले
लिंगायत समाजाचा आटपाडीत वधू वर परिचय मेळावा व पुरस्कार वितरण कार्यक्रम 31 डिसेंबर रोजी
By -
December 26, 2024
0
Post a Comment
0Comments