राष्ट्रीय लोकअदालतीत अडीच हजार प्रकरणे निकाली
सांगली, सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आयोजित लोक- अदालतीमध्ये एकूण 2 हजार 423 प्रकरणे निकाली करून 32 कोटी 94 लाख 46 हजार 406 रूपये रकमेची वसुली करण्यात आली, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी दिली.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष पी. के. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोकअदालतीला प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. बी. जाधव यांनी उपस्थित पक्षकारांना जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवून घेवून वेळ व पैसा वाचविण्याचे आवाहन केले होते.
लोकअदालतीत सांगली जिल्ह्यातील 1 हजार 169 दावापूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली करण्यात आली. तसेच सर्व न्यायालयातील मिळून 1 हजार 254 प्रलंबित प्रकरणे अशी एकूण 2 हजार 423 प्रकरणे निकाली करण्यात आली. या लोकअदालतीमध्ये सांगली जिल्ह्यातून एकूण 32 कोटी 94 लाख 46 हजार 406 रूपये रकमेची वसूली करण्यात आली,
या लोकअदालतीमध्ये सांगली मुख्यालय येथे पॅनेलप्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश-3 एस. आर. पडवळ, अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश क्र. 4 डी. वाय. गौड, एम. एम. राव, ए. बी. शेंडगे, श्रीमती एन. के. पाटील, व्ही. डी. घागी, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सांगली, व्ही. व्ही. पाटील, डब्लू. ए. सईद, श्रीमती आर. एस. पाटील, श्रीमती एस. एच. नलवडे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, सांगली तसेच डी. एस. पाटील औद्योगिक न्यायालय व एस. ए. उपाध्ये, निवृत्त न्यायाधीश, सांगली यांनी काम पाहिले. तसेच कन्सिलिएटर म्हणून ॲड. जे. व्ही. नवले, अॅड. मुक्ता दुबे, अॅड. फारूक कोतवाल, अॅड. मोहन कुलकर्णी, अॅड. विक्रांत वडेर, डॉ. पूजा नरवाडकर, अॅड. अमित पाटील, अॅड. अमोल डोंबे, अॅड. श्रीमती स्वाती गौड, अॅड. एस. एम. पखाली, अँड प्रशांत सोमण, अॅड सचिन गायकवाड पॅनेल अॅडव्होकेट यांनी काम पाहिले.
ही लोकअदालत यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी संपूर्ण लोकअदालतीचे नियोजन केले. यावेळी सांगली बार असोसिएशनचे अध्यक्ष किरण रजपूत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक नरहरी दांडेकर तसेच प्रफुल्ल मोकाशी, नितीन आंबेकर, विजय माळी, गौस नदाफ उपस्थित होते. लोकअदालतीवेळी पक्षकारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.
पुढील राष्ट्रीय लोकअदालत दि. 22 मार्च 2025 रोजी आयोजित करण्यात येणार असून पक्षकारांनी यामध्ये सहभाग घेवून आपली प्रकरणे तडजोडीने मिटवून घ्यावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगलीतर्फे करण्यात आले आहे.
Post a Comment
0Comments