आटपाडी शहरातील रस्त्याकडील अतिक्रमणधारकांना अतिक्रमणे काढून घ्या नोटीसा

Admin
By -
0

 आटपाडी शहरातील अतिक्रमण करणाऱ्या नगरपंचायतीने काल नोटीसा बजावल्या 24 तासात अतिक्रमणे काढून घ्या अन्यथा अतिक्रमणावर हातोडा टाकणार अशी भूमिका मुख्याधिकारी वैभव हजारे यांनी घेतली त्यामुळे शहरातील अंदाजे 400 ते 500 अतिक्रम धारकांचे धाबे दणाणले आहेत अतिक्रमणधारकांनी नेते मंडळीकडे धाव घेतली आहे त्यामुळे आटपाडीतील रस्त्याकडील अतिक्रमणे हटणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे आटपाडी शहरातील अण्णाभाऊ साठे चौक ते सांगोला रस्ता अण्णाभाऊ साठे चौक ते आवा नगर साई मंदिर ते सांगोला चौक महात्मा फुले चौक ते साई मंदिर असा रस्ता मंजूर झाला आहे या रस्त्याचे काम विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू होणे गरजेचे होते निवडणुकीपूर्वी रस्त्या कामाचे भूमिपूजन करून नारळ मोठा गाजावाजा करत फोडले गेले तर हा रस्ता लवकर सुरू व्हावा म्हणून आटपाडी शहरात आंदोलने केली गेले आंदोलन कर्त्यावर गुन्हेही दाखल झाले परंतु विधानसभा निवडणूक नंतर विकास कामे गतीन होतील याची शाश्वती देता येत नाही आटपाडी शहरात नागरी सुविधा ला अधिक महत्व न देता पुढील नगरपंचायतीच्या निवडणुका लक्षात घेऊन सत्तेचा खेळ सुरूच राहणार असल्याने अतिक्रमण द्वारकांना अभय देण्याची काम नेते मध्ये करणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारू लागलेत काल नगरपंचायतीने धाडस करून वीज वितरण कंपनीच्या पुढील नगरपंचायतीच्या जागेतील अतिक्रमणे हटवण्याचे कारवाई केली त्यामुळे मुख्याधिकारी वैभव हजारे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे आटपाडी शहरातील रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत त्यामुळे वाहतुकीची कोंडी अपघाताचे प्रमाण वाढले आहे आज दिवस भर रिक्षा शहरात फिरवून अतिक्रमणधारकाने 24 तासात अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन लाऊड स्पीकर केले त्यामुळे आटपाडीतील अतिक्रमण करणाऱ्यां चे धाबे दणाणले आहेत

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)