आटपाडी शहरातील अण्णाभाऊ साठे चौक ते बाजार पटांगण सांगोला कॉर्नर साई मंदिर चौकात रस्त्याचे काम लवकर सुरू होण्याची चिन्ह दिसत नाहीत कारण या रस्त्यावर असणारी अतिक्रमणे काढण्याचे धाडस प्रशासकीय अधिकारी यांना करावी लागेल तर आटपाडी शहराच्या विकासात अडथळा आणण्याचे काम नेते मंडळींनी करू नये अशी सर्वसामान्य माणसांची भावना आहे आटपाडी शहरातील रस्ते चांगले नसल्यामुळे बाजारपेठेवर वाईट परिणाम झाला आहे वाहतुकीची दररोज होणारी कोंडी रस्त्यावरून वाहणारे गटारीचे पाणी रस्त्यावर असणारी खड्डे त्यातून होणाऱ्या अपघात व पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालत नीट जाता येत नाही अशी अवस्था आहे दिघंची पासून आरवडे पर्यंत रस्ता झाला परंतु आटपाडी शहरातील रस्ता करण्यास नेते मंडळी व प्रशासकीय अधिकाऱ्यांना यश आले नाही अतिक्रमणे काढताना वाईटपणा येतो त्याचा परिणाम राजकारणा होतो त्यामुळे नेते मंडळी सबुरीचा सल्ला अधिकाऱ्यांना घ्यावयास लावतात त्यामुळे गेली दोन-तीन वर्ष आटपाडी रस्त्याचे काम झाले नाही रस्ता कामासाठी निधी कोट्यावधी रुपये निधी मंजूर झाला त्याचे टेंडर झाले परंतु अजून काम सुरू झालं नाही विधानसभा निवडणुकीनंतर लगेच रस्ता सुरू होईल अशी आशा होती परंतु खोकी धारकांना व अतिक्रम करणाऱ्या लोकांना नगरपंचायतीने अतिक्रमण काढा अशा नोटीस बजावल्या त्यामुळे खोक्यावर उदरनिर्वाह अवलंबून असणारे व्यवसायिकांनी नेते मंडळीकडे धाव घेतली आणि या कामाला काही महिन्याकरिता स्थगिती मिळवली अण्णाभाऊ साठे चौक ते साई मंदिर असा दहा मीटरचा रुंदीचा रस्ता होणार आहे रस्त्याच्या कडेला दीड मीटर गटर आहे या गटारीवर फुटपाथ आहे हा रस्ता करण्यापूर्वी रस्त्याच्या कडेला असणारी सर्व झाडे काढण्याची गरज आहे झाडे तोडण्याचे टेंडर ही झाले आहे त्यामुळे हे काम लवकर सुरू होईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर एस पाटील यांनी दिली तर हा या रस्त्याची काम सुरू होण्यापूर्वी आटपाडी शहरातील जलवाहिनीचे काम केल्यानंतरच रस्त्याचे कामाची सुरुवात करावी लागणार असल्याची माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव हजारे यांनी दिली आटपाडी शहराची सुधारणा करावयाची असेल तर स्थानिक लोकांनी सहकार्य केले पाहिजे अशी भावनाही श्री हजारे यांनी व्यक्त केली पाईपलाईन योजनेसाठी निधी मंजूर झाला आहे त्याचे टेंडर झाले या कामाची सुरुवात करण्यासाठी रस्त्याकडील अतिक्रमण काढणे गरजेचे आहे यासाठी सर्वांना अतिक्रमण काढून घ्या अशा नोटीसा बजावला आहेत एकंदरीत शासनाने कोट्यावधी रुपये रस्ता गटार फूटपाथ व पिण्याचे पाण्याची योजनेसाठी मंजूर केले आहेत त्याचे श्रेय आमदार सुहास बाबर यांना आहे खानापूर विधानसभा मतदारसंघातील दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निधनानंतरे सुपुत्र सुहास बाबर यांनी विकास कामांमध्ये लक्ष घालून तेराशे कोटीची कामे मतदारसंघात मंजूर करून आणली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना व सुहास बाबर आमदार नसताना कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर झाला मंजूर झालेल्या विकास कामाचे नारळ निवडणुकीपूर्वी वाजत गाजत फोडले निवडणुकीतही सुहास बाबर यांना भरघोस मताने मतदारांनी निवडून दिले आमदार केले आता मंजूर झालेल्या विकास कामातील अडथळा दूर करून कामे गतीने करण्याची जबाबदारी त्यांनाच पार पाडावी लागेल सर्वसामान्य जनता यांच्या असणाऱ्या अपेक्षा पूर्ण करावी लागतील लोकांना विकास पाहिजे सुधारणा पाहिजे परंतु कामातील येणाऱ्या अडथळ्याचा वाईट पणा घेण्याची ही तयारी ठेवावी लागेल त्यासाठी सामान्य लोक अडथळा आणणारे लोक प्रशासन अधिकारी नेते मंडळी यांचा समन्वय साधण्याची गरज आहे
Post a Comment
0Comments