न्यू हायस्कूल सांगली येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर
प्रभात फेरीव्दारेही केली कायदेविषयक जनजागृती
सांगली,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्या वतीने न्यू हायस्कूल सांगली येथे बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 या विषयावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 याबद्दल माहिती सांगितली. मुलांनी स्वावलंबी कसे बनावे व गुड टच बॅड टच याबद्दल माहिती दिली. अत्याचार व कोणीही शारीरिक जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्यास न घाबरता शाळेतील शिक्षक अथवा घरातील सदस्यांना याची कल्पना द्यावी. तसेच याबाबत पोलीसांची मदत घेण्यासाठी टोल फ्री नं 112 वर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शिबीर कार्यकमानंतर कायदेविषयक जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. प्रभात फेरीमध्ये बेटी बचाव … बेटी पढाओ, महिलांना द्या सन्मान … देश बनेल महान, दहेज मिटाओ …. बेटी पढ़ाओ या फलकाद्वारे विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीमध्ये मोठमोठ्यानी घोषणा दिल्या. या प्रभात फेरीमध्ये शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विजय कोगनोळे व जिल्हा प्राधिकरण सांगली चे कर्मचारी सहभागी होते.
Post a Comment
0Comments