आमदार गोपीचंद पडळकर यांचा आटपाडीत भव्य सत्कार व मिरवणूक

Admin
By -
0

  आटपाडी चे भूमिपुत्र आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भव्य नागरिक सत्काराची तयारी आटपाडी येथे जोरात सुरू आहे मंगळवार दिनांक 24 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता आटपाडी शहरातून त्यांची भव्य मिरवणूक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बचत धाम पटांगणावर जाहीर सत्कार असा कार्यक्रम भाजपच्या वतीने आयोजित केला आहे याच्या तयारीसाठी आज आटपाडी व विटा येथे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी कार्यकर्त्याच्या बैठक घेऊन मिरवणूक व जाहीर सत्कार याचे नियोजन केले जत विधानसभा मतदार संघातून गोपीचंद पडळकर आमदार म्हणून मोठ्या मताधिक्याने विजय झाले त्याबद्दल सत्काराचे आयोजन केले आहे आटपाडी शहरातील मुख्य रस्त्यावर स्वागत कमानी पंचायत समिती बचत दाम बाजार पटांगण चौक साई मंदिर या रस्त्यावर उभारले आहेत प्रत्येक चौकात डिजिटल पोस्टर लावली आहेत सत्कार समारंभांची जोरदार तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे जत चे पडळकर विकास पुत्र असले तरी आटपाडीची भूमिपुत्र आहेत आटपाडी तालुका सोडून जत मध्ये जाऊन त्यांनी विजयश्री खेचून आणली विधान परिषदेवर आमदार असताना विधानसभेवरही निवडून आले राष्ट्रीय समाज पक्ष वंचित बहुजन विकास आघाडी भाजप असा त्यांनी राजकीय प्रवास केला जिल्हा परिषद विधानसभा निवडणूक ही त्यांनी लढवली संघर्षातून प्रस्थापित विरोधात त्यांनी आवाज उठवला धनगर समाजाचे संघटन केलेभाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे सहकारी आहेत 


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)