राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे सर्व निवडणूका लढवणार युवक नेते वैभव दादा पाटील
By -
December 25, 20241 minute read
0
गावच्या सोसायटी पासून जिल्हा परिषद पर्यंतच्या सर्व निवडणुका,ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते विट्या माजी चे नगराध्यक्ष वैभव दादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आज आटपाडी येथील विश्राम धाम येथे राष्ट्रवादीच्या आटपाडी तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्यानंतर बैठकीत घेतलेल्या निर्णय पत्रकार परिषदेत सांगितला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख विष्णुपंत पाटील युवक अध्यक्ष सुरज पाटील अनिता पाटील प्रभाकर नांगरे सचिन राजमाने डॉक्टर तुषार पवार उत्तम माने सुनील लेंगरे अखिल नांगरे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होत े वैभव पाटील म्हणाले विधानसभा निवडणुकीत पराभव ईव्हीएम मशीन मुळे झाला आहे गेली पाच वर्ष खानापूर विधानसभा मतदारसंघात जनसंपर्क वाढवला होता जनतेच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले होते माझे आजोबा आमदार हणमंतराव पाटील माझे वडील माजी आमदार सदाशिव पाटील यांच्यापासून या मतदारसंघात आमचा संपर्क आहे ही निवडणूक विरोधक केवळ ईव्हीएम मशीन मुळे जिंकू शकले निवडणूक निकालात पराभूत झाले म्हणून घरी बसलो नाही तर दुसऱ्या दिवसापासून राज्यात प्रथम ईव्हीएम विरुद्ध आवाज उठवला यापुढील सर्व निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ताकतीने लढवण्याचा निर्णय घेतला आहे आटपाडी तालुक्यात संपर्क ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा वार निश्चित करून कार्यकर्ते मतदार सर्वसामान्य जनता यांचे प्रश्न सोडण्यासाठी सातत्य ठेवले जाईल कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल सोसायटी ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपरिषद पंचायत समिती जिल्हा परिषद या सर्व निवडणुका लढवण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे पक्षाचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख म्हणाले वैभव दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातील विधानसभा निवडणुकी वेळी आमच्याबरोबर असणारे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत नवीन येणार आहे आम्ही स्वागत करू
Post a Comment
0Comments