माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन

Admin
By -
0


माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन.सरदार' हरपला!, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास:जन्म - २६ सप्टेंबर १९३२ (गाह,पंजाब)पाडी:माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे आज २६ डिसेंबर २०२४ रोजी नवी दिल्ली येथे निधन झाले. ते भारताचे चौदावे पंतप्रधान होते. ते एक विचारवंत व अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी ब्रिटिश भारताच्या पंजाब प्रांतात म्हणजेच आताचा पाकिस्तान या भागात झाला. त्यांच्या आईचे नाव अमृतकौर आणि वडिलांचे नाव गुरमूख सिंग होते. देशाचे विभाजन झाल्या नंतर त्यांचे कुटुंब भारतात आले. त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी श्रीमती गुरशरण कौर आणि तीन मुली असा परि,वार मनमोहन  सिंग यांनी १९४८ साली पंजाब विद्यापीठातून उच्च शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांचे शैक्षणिक कर्तृत्व पंजाब विद्यापीठ पासून इंग्लंड मधील केम्ब्रिज विद्यापीठ पर्यंत विस्तारलेले होते. १९५७ साली त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात प्रथम श्रेणी मध्ये पदवी प्राप्त केली. नंतर १९६२ साली त्यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात डी.फील संपादन केली. त्यांचे ‘इंडियाज एक्स्पोर्ट ट्रेंड्स अन्ड प्रोस्पेक्ट्स फोर सेल्फ ससटेन्ड ग्रोथ’ हे पुस्तक भारताच्या अंतस्थ व्यापारी धोरणाची समीक्षा करणारे आहे.मनमोहन सिंग हे पंजाब विद्यापीठात आणि नंतर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये लेक्चरर होते. या दरम्यान ते व्यापार आणि विकास सचिवालय संयुक्त राष्ट्राच्या परिषदेचे सल्लागार देखिल होते. त्यांनी १९८७ आणि १९९० मध्ये जिनिव्हा येथे दक्षिण आयोगाचे सचिव सुद्धा होते. १९७१ मध्ये त्यांची भारतीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर लवकरच त्यांना अर्थ मंत्रालय यात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नेमण्यात आले व त्याच्या काही वर्षात ते भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडियाचे नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. ते राज्यपाल पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. भारताचे अर्थमंत्री असतांना भारताच्या आर्थिक इतिहासातील सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट त्यांच्या जीवनात आला. त्यांना भारताच्या आर्थिक सुधारणांचे जनक मानले जाते. सर्वसामान्यांमध्ये हे वर्ष नक्कीच त्यांच्या व्यक्तिमत्वा भोवती फिरलेआहे

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)