भाजपच्या कार्यकर्तेच्या ताकती ने पाठीशी आमदार गोपीचंद पडळकर .

Admin
By -
0


 *भाजप कार्यकर्त्यांच्या ताकतीने पाठीशी-आमदार गोपीचंद पडळकर* 


तासगाव / प्रतिनिधी 


तासगाव तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या ठामपणे पाठीशी असल्याचे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. झरे ता.आटपाडी येथे तासगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने जत विधानसभा निवडणुकीत आमदारपदी निवड झाल्याबद्दल सत्कार प्रसंगी ते बोलत होते.


आ. पडळकर पुढे म्हणाले की,महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा महायुतीचे सरकार मोठ्या बहुमताने सत्तेत आले आहे. सांगली जिल्ह्यातही भाजपचे चार आमदार निवडून आलेले आहेत. तासगाव तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या कोणत्याही अडीअडचणीसाठी मदतीसाठी प्रयत्नशील राहु. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. तासगाव तालुक्यात अनेक वर्षापासून भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते काम करत आहेत. याची पक्षाला जाणीव आहे. विधानसभा अधिवेशनानंतर तासगाव मधील सत्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहीन.


यावेळी भाजपा ग्रामविकास व पंचायत राज सांगली जिल्हाध्यक्ष महेश पाटील, संतोष पोळ, पंढरीनाथ पाटील, राघवेंद्र चौगुले, विश्वनाथ पाटील, गौडेश पाटील, सुभाष माळी आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)