माझ्या गावचा धडा एक दिवसीय कार्यशाळा सांगली जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून साकारलेला एक अभिनव उपक्रम माझ्या गावचा धडा या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा श्रीराम कॉलेज आटपाडीत झाली .कार्यशाळेसाठी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी कोळपे साहेब, सर्व केंद्रांचे केंद्र प्रमुख,समग्र शिक्षा आटपाडी लेखाधिकारी प्रशांत चंदनशिवे , सचिन हेगडे प्रशांत हेगडे व तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते. .माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
गटशिक्षणाधिकारी कोळपे साहेब यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. ऊपशिक्षणाधिकारी डॉ. विमल माने जिल्हा परिषद सांगली) दीपक माळी (माळीनगर देशींग), संदीप पाटील (बागणी), नसीमा मुजावर (बेडग, मिरज), डॉ स्वाती शिंदे( विटा), बाबासाहेब परीट (बिळाशी शिराळा) मार्गदर्शन लाभले. दीपक माळी यांनी अभिव्यक्तीसाठी लेखन किती आवश्यक आहे याची अत्यंत सखोलपणे माहिती सांगत असताना स्वतःच्या शाळेचे प्रेरणादायी अनुभव कथन केले तसेच ब्रेन रॉट टाळण्यासाठी वाचन सराव किती आवश्यक आहे याकडेही लक्ष वेधले.या रान मळ्यात माझ्या... पुन्हा एकदा ये रं राजा..... या कवितेने सर्वांना मंत्रमुग्ध केले.जिल्हा परिषद शाळा बागणीचे आदरणीय संदीप पाटील सर यांनी वयोगट, इयत्ता निहाय,अध्ययन निष्पत्ती निहाय धडे, विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी अनुरूप धडे कसे लिहावेत याविषयी महत्त्वाची माहिती सांगितली. लेखन का आवश्यक आहे आपल्या शाळेसाठी आपल्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी लेखनाचे महत्त्व त्यांनी विशद केले. नसीमा मुजावर यांनी धड्याचे टप्पे कोणते आहेत, ते कोणत्या क्रमाने असावेत याविषयी सविस्तर आणि अभ्यासपूर्ण माहिती सांगितली.डॉ स्वाती शिंदे यांनी वेगवेगळ्या अनुभवांच्याद्वारे लेखन अभिव्यक्ती किती महत्त्वाची आहे हे सांगत धडे कसे असावेत , त्यासाठी कोणता फॉन्ट तसेच किती साईज असावी फोटो कसे असावेत याविषयी मार्गदर्शन केले.बाबा साहेब परीट यांनी आपल्या धारदार शैलीने उपस्थित सर्व अध्यापकांची मने जिंकली. कथेतून, कवितेतून अभिव्यक्तीचे महत्त्व विशद करत असतानाच शिक्षकांचे वाचन आणि लेखन प्रवाही असावे हे सांगत त्यांनी सर्व अध्यापकांना मंत्रमुग्ध केले.आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक डॉक्टर विमल माने मॅडम यांनी आपल्या खास शैलीमध्ये सर्व शिक्षकांना अत्यंत मौलिक मार्गदर्शन करून आपल्या या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या, आणि सर्व शिक्षकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला त्याबद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.
नारायण कदम सर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण शैलीतून या सर्व मान्यवरांचे व उपस्थित शिक्षक बंधू भगिनींचे आभार मानले . समग्र शिक्षा पंचायत समिती आटपाडी यांनी सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केलेले होते
Post a Comment
0Comments