सन 2025 च्या स्थानिक सुट्या जाहीर
सांगली, दि. 2,सांगली जिल्ह्यातील सर्व महाराष्ट्र शासनाच्या कार्यालयांसाठी तसेच सर्व निमशासकीय कार्यालयांसाठी जिल्हा प्रशासनाने सन 2025 मधील स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत.
जाहीर केलेल्या स्थानिक सुट्या पुढीलप्रमाणे. मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 (मकर संक्रांती), सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 (घटस्थापना) व सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर 2025 (नरक चतुर्दशी).
Post a Comment
0Comments