मंगळवारपासून जनावराच्या खरेदी विक्री खरसुंडी त

Admin
By -
0

 महाराष्ट्र ,कर्नाटक व आंध्र प्रदेश या तिन्ही राज्यात जातिवंत खिलार जनावरांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या खरसुंडी ता. आटपाडी येथील यात्रेस सोमवार ता. 13 रोजी सुरुवात होणार आहे. 

जातिवंत जनावरांची प्रचंड आवक व दर्दी खरेदीदार यांची मोठ्या प्रमाणावर हजेरी यामुळे हा बाजार तिन्ही राज्यात प्रसिद्ध आहे .उद्या ता. १३

 रोजी शेळ्या मेंढ्यांच्या खरेदी विक्रीने बाजारास सुरुवात होणार आहे. भिवघाट रोडवरील वीज मंडळा जवळ  हा बाजार भरवण्यात आला आहे .यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक सुरू असून मंगळवार  पासून खरेदी विक्रीला सुरुवात होईल असा अंदाज आहे. 

यात्रा तळावर कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी यांचे तंबू कार्यालय दाखल झाले असून या ठिकाणी यात्रेच्या अनुषंगाने वीज, पाणी ,आरोग्य अशा सुविधा पुरविण्यात येत आहेत. ग्रामपंचायत खरसुंडी यांच्यावतीने यात्रेमध्ये आलेल्या व्यापाऱ्यांना जागा वाटप व अन्य सुविधांची तयारी सुरू आहे. 

दरम्यान आज रात्री नऊ वाजता मुख्य मंदिरात पालखी सोहळा होणार असून श्री सिद्धनाथांचे शिकारीसाठी काशी क्षेत्राकडे प्रस्थान होणार आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)