माणदेशातील आटपाडी तालुक्यातील यावर्षी हंगामात पिकवलेले डाळिंब फळ मुंबई येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात मूर्ती पुढे आरास करण्याचा मान आटपाडीतील डाळिंब बाग शेतकऱ्यांना मिळाला आटपाडीतील प्रगतशील डाळिंब बागायतदार शेतकरी सिद्धिविनायक ट्रस्टचे विश्वस्त राजाराम देशमुख साहेब गणेश सूर्यवंशी ,शिवाजी सूर्यवंशी यांनी माणदेशातील पिकवलेली डाळिंबी सिद्धिविनायकाच्या चरणी आरास केली आटपाडीचे भूमिपुत्र राजाराम देशमुख यांनी मुंबईत जाऊन सराफ व्यवसायात नाव कमावले विविध राजकीय पक्षांमध्ये मानाचे स्थानही मिळवले आपला व्यवसाय बघत आटपाडीचे नाव चांगल्या कामाने सर्व दूर पोहोचण्याचे काम सातत्याने करत असतात मुंबई येथील श्री सिद्धिविनायक ट्रस्टचे ते विश्वस्त आहेत मुंबईचा गणपती दर्शनासाठी हजारो भाविकांची रांग मंदिरापुढे असते मुंबई सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या मानदेशातील भाविकांना व्हीआयपी दर्शन करण्यासाठी राजाराम देशमुख सातत्याने सर्वांना सहकार्य मदत करत असतात त्यांनी पिकवलेल्या डाळिंब फळाची आरास करण्याचा मान ही त्यांना मिळाला माणदेशात अनेक रत्न जन्मले त्याने विविध क्षेत्रात देशातील अनेक मोठ्या शहरात राजधानीत जाऊन नाव कमवले,मान देशातील हवामान कोरडे आहे जमीन खडकाळ आहे डाळिंब पिकास पोषक वातावरण आहे येथील जिद्दी शेतकऱ्यांनी कष्ट करून डाळिंब फळबाग लागवडीमध्ये चांगले काम केले या भागातील डाळिंबे गोड दाणे लाल ,आरोग्यस फायदेशीर आहेत त्यामुळे खाण्यास चांगले असल्याने देशात परदेशात मागणी आहे शेतकऱ्यांना डाळिंब पिकामुळे आर्थिक प्रगती झाली आहे सिद्धिविनायकाच्या चरणी डाळिंब ठेवून या भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक प्रगती होऊ दे अशी विनंती परमेश्वर चरणी श्री राजाराम देशमुख यांनी केली आहे
Post a Comment
0Comments