वांड्:मयीन भिंतीपत्रिकेचेही केले उद्घाटन
आटपाडी येथील श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालया मधील मराठी विभागात असणाऱ्या दुर्मिळ ग्रंथ संपदा विभागास महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य आणि शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागात सध्या कार्यरत असणारे विभागाचे माजी विभाग प्रमुख, प्रा. डॉ. रणधीर शिंदे आणि वाई येथील मराठी विश्वकोश कार्यालयाचे सहाय्यक संपादक डॉ. दत्ता घोलप या मान्यवरांनी भेट दिली. त्याचवेळी, मराठी विभागातील वांड्:मयीन भिंत्तिपत्रिकेचे उद्घाटनही या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सन २०१२-१३ पासून माणदेशातील अत्यंत दुर्मिळ अशा साधारण पाच लाख मराठी शाहिरी रचनांचे संवर्धन या मराठी विभागामध्ये कार्यरत असणारे महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. रामदास नाईकनवरे यांनी केले आहे.
माणदेशातील सामाजिक ,सांस्कृतिक, धार्मिक जीवन व त्यांच्यामधील वैदिक -- अवैदीक परंपरा, प्रबोधनात्मक चळवळी, भाषा, इत्यादी घटकावर प्रकाश टाकणार्या या शाहीरी रचना असून या दुर्मिळ शाहरी मधून शाहीरांनी हाताळलेले विविध गद्यात्मक व पद्यात्मक रचना, त्यामधून शाहीरांनी रचलेल्या साकी , छंद, कटाव, लावणी बतावणी अशा विविध धार्मिक विषयावरील केलेल्या टीका व काही यक्ष प्रश्न इत्यादी विषयांचे होणारे संशोधन कार्य मराठी संशोधनाला व माणदेशी समाज जीवनाला निश्चित वेगळी दिशा देणारी ठरेल. अशी अपेक्षा प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी भेटीवेळी व्यक्त केली.
याप्रसंगी, उपस्थित मान्यवरांचे प्राचार्य, डॉ. रामदास नाईकनवरे यांच्या हस्ते शाल, फेटा व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर मराठी विभाग प्रमुख प्रा. बालाजी वाघमोडे यांनी मान्यवरांचे स्वागत करून त्यांचे आभारही मानले. याप्रसंगी, सावळज येथील रावसाहेब रामराव पाटील महाविद्यालयाचे मराठी विभागातील डॉ. बळवंत मगदूम, प्रा. आप्पासाहेब सुतार, झरे येथील महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. राजाराम पाटील, आटपाडी येथील एस. बी. डी. एम. च्या मराठी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. विजय शिंदे यांच्यासह कला व विज्ञान महाविद्यालयातील प्रा. धनाजी गायकवाड , श्री. विश्वेश्वर खंदारे, श्री. नागनाथ कुंभार, श्री. मारुती हेगडे, श्री. गोविंद चव्हाण इत्यादी उपस्थित होते.
Post a Comment
0Comments