विष्णूपंत रामचंद्र लोणारी (दादरे) यांच्या ९२व्या जयंतीनिमित्त गुरुकुल विद्यालयात आटपाडी रक्तदान शिबिर व पालक मेळावा

Admin
By -
0


 स्वर्गीय श्री. विष्णूपंत रामचंद्र लोणारी (दादरे) यांच्या ९२व्या जयंतीनिमित्त गुरुकुल विद्यालयात रक्तदान शिबिर व पालक मेळावा संपन्न

गुरुकुल विद्यालयात स्वर्गीय श्री. विष्णूपंत रामचंद्र लोणारी (दादरे) यांच्या ९२व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत, रक्तदान शिबिरात एकूण ४० रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वर्गीय श्री. विष्णूपंत रामचंद्र लोणारी (दादरे) यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोणारी समाज सेवा संघ, सांगोलाचे अध्यक्ष श्री. संतोष करांडे, लोणारी समाज सेवा संघ मुंबईचे माजी अध्यक्ष श्री. साहेबराव गळवे, माजी उपाध्यक्ष श्री. अशोक करांडे, श्री. महादेव खिलारी आणि प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पोपट साळुंखे उपस्थित होते.

कार्यक्रमात शाळेची विद्यार्थिनी ऋतुजा डुकरे हिचा तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रमुख पाहुणे श्री. संतोष करांडे यांनी स्वर्गीय विष्णूपंत रामचंद्र लोणारी (दादरे) यांच्या समाजासाठीच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांनी लोणारी समाजाला विशिष्ट ओळख देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले असल्याचे प्रतिपादन केले.

विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. प्रफुल्ल कुर्हे यांनी "दादा एक आदर्श व विद्यार्थी जडणघडण" या विषयावर मार्गदर्शन केले. संस्थेचे माजी अध्यक्ष श्री. साहेबराव गळवे यांनी अध्यक्षीय मनोगतातून स्वर्गीय विष्णूपंत लोणारी यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला तसेच त्यांच्यासोबतचे अनुभवही सांगितले. विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री भालचंद्र करांडे सर यांनी उपस्थितांचे व रक्तदात्याचे आभार मानले.

रक्तदान शिबिर व पालक मेळावा यशस्वी करण्यासाठी गुरुकुल विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी आणि लोणारी समाज सेवा संघाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमातून सामाजिक एकजूट आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा जागवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

स्वर्गीय विष्णूपंत रामचंद्र लोणारी (दादरे) यांच्या आठवणींना उजाळादेत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी व एकात्मतेचा संदेश दिला गेला.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)