माणदेश जिल्ह्याचे, जिल्हा ठिकाण " आटपाडी " व्हावे . - सादिक खाटीक .
आटपाडी लवकरच होवू घातलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या *माणदेश जिल्ह्याचे, जिल्हा ठिकाण " आटपाडी " व्हावे,* या न्याय लक्षवेधी मागणीच्या अनुषंगाने राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना तातडीने सुचित केले जावे, यासाठीचे साकडे आटपाडीचे ज्येष्ट पत्रकार सादिक खाटीक यांनी अनेक मान्यवर महोदयांना घातले आहे .
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, आटपाडीचे सुपुत्र उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक साहेब, राज्याचे माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील, आटपाडीचे आणखी एक सुपुत्र राजीव खांडेकर यांच्यासह, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील सर्व लोकसभा, राज्यसभा खासदार महोदय, महाराष्ट्र विधानसभा, विधान परिषदेतील सर्व आमदार महोदय, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील लोकसभा, राज्यसभेवरील सर्व खासदार महोदय , विधानसभा, विधान परिषदेतील सर्व आमदार महोदय आणि
महाराष्ट्रात सध्या अस्तित्वात असलेल्या ३६ जिल्ह्यात आणखी नवीन २१ जिल्ह्यांची निर्मिती होत असल्याचे वृत्त प्रसार माध्यमातून प्रसारीत झाले आहे आणि या नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा येत्या काही दिवसात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .
या नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीत सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांचा समावेश करून नवीन माणदेश जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याचे या वृत्तात म्हटले गेले आहे . नवीन २१ जिल्ह्यां बरोबरच माणदेश जिल्हा होत असल्याचा आम्हां माणदेशींना मोठा आनंद होतो आहे . या माणदेश जिल्हा निर्मितीच्या पार्श्वभूमीवर, शतकापासून उपेक्षित, वंचित, मागास ठेवल्या गेलेल्या आटपाडी तालुक्यातले *"आटपाडी शहर " , माणदेश जिल्ह्याचे जिल्हा ठिकाण म्हणून घोषीत झाले पाहिजे .* अशी माझ्या सारख्या असंख्य माणदेशींची अंतरीची न्याय मागणी आहे .
दुष्काळी तालुक्यांचा आटपाडी जिल्हा व्हावा . ही मागणी प्रथमतः आटपाडी तालुक्याचे शिल्पकार बाबासाहेब देशमुख यांनी १९७० च्या दशकात एका पाणी परिषदेच्या वेळी केली होती . माणदेशातील अनेक व्यासपीठावरून माणदेश जिल्ह्याच्या मागणीचा वेळोवेळी आवाज उठत आला आहे . १९८९ ते ९३ साला दरम्यान झालेल्या माणदेश ज्ञानपीठच्या दहिवडी, सांगोला येथील साहित्य संमेलनातही या मागणीला पुढे रेटण्यात आले होते . दहिवडीच्या साहित्य संमेलनात, मी ( सादिक खाटीक ) , सुभाष कवडे सर, प्राचार्य सयाजीराजे मोकाशी यांनी, माणदेश जिल्हाची ही मागणी जोरात लावून धरली होती . माझ्या पत्रकारीतेच्या ३६ वर्षाच्या कार्यकाळात, माणदेश जिल्हा व्हावा, *माणदेश जिल्ह्याचे ठिकाण आटपाडी असावे,* यावर मी सातत्याने लिखाण केले आहे . विविध व्यासपीठ, बैठका, मिटींगामध्ये, माणदेश जिल्हा व्हावा आणि या जिल्ह्याचे ठिकाण आटपाडीच असावे, यावर ठाम मत मी मांडले आहे. याचेही शेकडो जण साक्षीदार आहेत .
सांगली जिल्ह्यातील आटपाडी, खानापूर, जत, कवठेमहंकाळ, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा आणि सातारा जिल्ह्यातील माण, खटाव या तालुक्यांचा माणदेशात समावेश होतो . या माणदेशी आठ तालुक्यात सर्वांना सोयीचे आणि मध्यवर्ती ठिकाण म्हणून *आटपाडी शहरच* ठरू शकते. यासंदर्भाने भाष्य करताना सादिक खाटीक यांनी अनेक मुद्यांचा परामर्श घेतला आहे .
माणदेशातल्या या आठ तालुक्यातल्या *आटपाडी तालुक्याला* मोठा ऐतिहासीक, साहित्यीक, सांस्कृतीक वारसा लाभला आहे . आटपाडी तालुक्याशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संबंध असणारे , महाकवी ग . दि. माडगूळकर, व्यंकटेशतात्या माडगूळकर, शंकरराव खरात, ना . सं . इनामदार, औंध अधिपती बाळासाहेब उर्फ भवानराव पंतप्रतिनिधी, हे पाच मान्यवर साहित्यीक *अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले होते .* आटपाडी मुख्य महाल असलेल्या आणि आटपाडी तालुका सर्वार्थाने पुढे यावा, यासाठी सदैव आस्था बाळगणाऱ्या, औंध संस्थानचे राजपूत्र *बॅरिस्टर आप्पासाहेब पंत प्रतिनिधींनी* भारताचे राजदूत म्हणून मोठी देशसेवा बजावली आहे . आटपाडीच्या *म . गो . तथा बाबा पाठक* यांनी सिनेसृष्टीत दिग्दर्शक म्हणून मोठे नाव कमावले आहे . तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते *लावणी सम्राज्ञी हा पुरस्कार मिळविणाऱ्या सत्यभामाबाई पंढरपूरकर* या मुळच्या आटपाडी तालुक्याच्या बनपुरीच्या . मुंबईतून अनेक वेळा आमदार, खासदार, नामदार झालेले *श्री . राम नाईक साहेब* हे ही आटपाडीचेच . भारतीय राजकारणात देश स्तरावर चमकलेले आटपाडी तालुक्यातील करगणी गावचे *प्रा . अरुण कांबळे, त्यांच्या साहित्यीक मातोश्री शांताबाई कांबळे,* जत विधानसभा मतदार संघातून दोन वेळा जिंकणारे *ॲड . जयंत सोहनी साहेब* हे ही आटपाडी तालुक्यातील गोमेवाडीचे . नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत जतेतून विधानसभा निवडणूक जिंकणारे *आमदार गोपीचंद पडळकर* हे सुद्धा आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीचे . विधान परिषदेत १२ वर्षे आमदार राहीलेले पुणे स्थित, *ग . दि . माडगुळकर आण्णा* मुळचे आटपाडी लगतच्या माडगुळ्याचे . राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, स्तरावर नावाजलेले मराठी भाषेच्या एबीपी माझा या मराठी न्यूज चॅनेलचे संपादक *राजीव खांडेकर साहेब* हे ही आटपाडीचेच . सातासमुद्रापार नावलौकीक संपादन केलेल्या, सुवर्ण, रौप्य, कास्य पदके मिळविणाऱ्या अनेक गुणवंत, प्रज्ञावंत, किर्तीवंतांची जन्मभूमी, कर्मभूमी, कुळभुमी आटपाडी तालुका आहे. अर्जून पुरस्कार विजेते करगणीचे *सचिन सर्जेराव खिलारी, सुवर्ण, रौप्य पदके मिळविणारे तळेवाडीचे संकेत सरगर, काजल सरगर बंधु - भगिनी,* अनेक जिल्ह्यातल्या पैलवानांना आटपाडीच्या तालमीतून तयार करणारे, शिवछत्रपती कीडा पुरस्कार प्राप्त *वस्ताद पै . नामदेव बडरे,* आपल्या ज्ञानदानाने माणदेशातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात गुणवत्तेचा झेंडा फडकावणाऱ्या लोणारी समाज संस्थेचे, आटपाडीतील *गुरुकुल* माणदेशाचे वैभव ठरू लागले आहे . हे वास्तव भारतातील व भारताबाहेरील करोडो लोकांना माहीत आहे.
दर तीन वर्षांनी प्रचंड दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या आटपाडी तालुक्याच्या वाट्याला गत शतकात मात्र मोठे दुर्देवच आले आहे . प्रचंड कर्तृत्वसंपन्न, व्यक्तीमत्वांची जननी असणाऱ्या आटपाडी तालुक्याची राजकीय, सामाजीक, शेतीच्या, पिण्याच्या, पाण्याच्या दृष्टीने मोठी होरपळ झाल्याचे, कोणताही माणदेशी आणि आटपाडी लगतचे तीनही जिल्ह्यातील लोक नाकारणार नाहीत .
दीड शतकापासून आटपाडी तालुक्यातल्या *राजेवाडी* येथे असणाऱ्या ३ टी . एम . सी . क्षमतेच्या तलावाचे नाव मात्र शेजारच्या सातारा जिल्हाच्या माण तालुक्यातल्या *म्हसवडचे.* आटपाडी तालुक्यातल्या राजेवाडीतल्या या तलावाचे नाव आजही शासन स्तरावर *" म्हसवड तलाव "* असेच आहे. या तलावाचा कारभार पाहणारे मुख्यालय राजेवाडीपासून १०० कि . मी . अंतरावरील *फलटणला*. आणि या तलावाचे बहुतांश पाणी जाते, *सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला, पंढरपूर तालुक्याला.* सद्य स्थितीत, या दोन्ही तालुक्यांना सर्व बाजूंनी विविध पाणी योजनातून पाणी मिळत असतानाही राजेवाडीच्या बहुतांश पाण्यापासून आटपाडी तालुक्यावाशीय वंचितच राहीले आहेत .
*झुक झुक आगीनगाडीच्या* अजरामर गीतातून शतकापासून रेल्वेचे स्वप्न पाहणाऱ्या *ग . दि . माडगुळकर आण्णांच्या* आटपाडी तालुक्याला खऱ्या अर्थाने रेल्वे आणि विमान सेवेची नितांत आवश्यकता आहे . भारताबाहेर अनेक देशात आणि भारतातल्या प्रत्येक शहरात कार्यरत असणाऱ्या हजारो गलाई बांधवाना आटपाडी - खानापूर तालुक्यात सर्वत्र जलद ये - जा करण्यासाठी रेल्वे आणि विमान वाहतुकीची सेवा अति आवश्यक आहे . भारतात सर्वात प्रभावी ठरणाऱ्या पशुधनामध्ये खिलार जनावरांचे निर्मितीस्थान असणाऱ्या आटपाडी तालुक्यातील व माणदेशातील खिलार जनावरांची, देशातील शेती आणि दुध - दुभत्यासाठी मोठी मागणी आहे व सर्वत्र नितांत गरज आहे . इतकेच नव्हे तर आटपाडी तालुका व लगतच्या तालुक्यातील शेळ्या - मेंढ्या वर्गातील या लहान जनावरांच्या दुध, मांस, कातड्याची जगभरात मोठी मागणी आहे . आटपाडीत शनिवारी भरणारा शेळ्या, मेंढ्या, बोकडे, बकरे, पाटी, लाव्हरांचा बाजार, पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठा बाजार म्हणून गणला जातो आहे . *राजस्थानच्या जैसेलमेर* इतकी उष्णतेची घनता असणाऱ्या आटपाडी तालुक्यात सौर उर्जा प्रकल्पाला प्रचंड वाव आहे . तालुक्यातल्या असंख्य डोंगरांवर पवन उर्जेच्या *पवन चक्क्या* उभारणीस पोषक स्थिती आहे . हजारो एकरात बांबु लागवड, बाबुं उद्योगावर आधारीत कारखानदारी, डाळींब, द्राक्ष, व इतर फळ फळांवर प्रक्रिया करणारी कारखानदारी येथे उत्तमरित्या चालु शकते. देशात सर्वोत्तम ठरेल अशा शेळ्या - मेंढ्या या लहान जनावरांचे मांस परदेशी निर्यात करणारी व्यवस्था सुद्धा आटपाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उभारता येवू शकते . अशीच येथील सर्वकष स्थिती आहे . कापसाचे प्रचंड आगर असणाऱ्या आटपाडी तालुक्यासह, माणदेशात सुत, कापड, निर्मिती व्यवसायाला मोठी संधी आहे . याशिवाय हजारो एकरात साकारू शकणारी बेंगलोर कॉरीडोर सारखी हजारो कोटी रुपये गुंतवणूकीची मोठी औद्योगिक वसाहत उभारण्यात आटपाडी शहरालगत तसेच तालुक्यात अन्यत्र मोठी पोषक स्थिती आहे.
जगविख्यात *दो आँखे बारह हाथ* या चित्रपटाच्या निर्मितीस कारणीभूत ठरलेली आणि १९३७ साली आटपाडीत उभारली गेलेली *कैद्यांची स्वतंत्रपूरातली खुली वसाहत* ही भारतात नव्हे तर आशीया खंडातली , क्रुर , गुन्हेगार, सैतानाना, पुन्हा माणसात आणणारी, मानवतावादी भूमिका, कृतीतून साकारणारी *पहिली वसाहत होती, आणि आजही तिची महती जगभर आहे .*
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात असंख्य क्रांतीकारकांना सर्वतोपरी मदत करणाऱ्या आटपाडी तालुक्याने, सदैव माणदेशाच्या केंद्रस्थानी रहात माणदेशाची मोठी सेवा बजावली आहे . लगतच्या तिन्ही जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असणारी,
Post a Comment
0Comments