आटपाडीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्याच्या आंदोलनात सहभागी 47 कार्यकर्त्यावर आटपाडी पोलिसात गुन्हे दाखल
By -
February 03, 2025
0
आटपाडी पोलिसांनी 47 जणावर,गुन्हे दाखल केले आहेत आटपाडी सांगोला चौकात बेकायदेशीर रित्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवला वादातून रस्ता रोको आंदोलन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे शनिवारी मध्ये रात्री आटपाडी ते सांगोला चौकात आंबेडकर यांचा पुतळा भीमसैनिकांनी बसवला हा पुतळा काढून घ्यावा म्हणून पोलीस व प्रशासनाने भीमसैनिकांना विनंती केली परंतु त्यांनी म्हणणे ऐकले नाही त्यानंतर मध्यरात्री सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांनी पुतळा जप्त केला ही माहिती भीमसैनिकांना सकाळी काढल्यानंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले त्यांनी रस्ता रोको केला आटपाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला पोलीस ठाण्यात दोन तास ठिय्या आंदोलन केले तर गनिमा कावा करून दुसरा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणून पुन्हा बसवला त्यामुळे ,शनिवार रविवारी दोन दिवस आटपाडीत वातावरण तप्त झाले होते बाजार पटांगण ते सांगोला कॉर्नर या ठिकाणची वाहतूक आंदोलन काळात वळवण्यात आली होती पुतळा ठिकाणी दिवसभर पोलीस बंदोबस्त ज्यादा तैनात करण्यात आला ,आंदोलनात सहभागी झालेल्या 47 कार्यकर्त्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत त्यामध्ये स्वाभिमानी बहुजन विकास आघाडीचे नेते अरुण वाघमारे शैलेश ऐवळे सनी कदम रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे राजेंद्र खरात करण कदम सिद्धनाथ तोरणे शेखर खरात गणेश पवार रणजीत ऐवळे समाधान खरात नामदेव खरात विवेक सावंत दादासाहेब कदम सुयश कदम दुर्योधन जावीर सुरज पवार रोहित चंदनशिवे विनोद ऐवळे आबासाहेब ऐवळे बाबासाहेब वाघमारे सुशील कुमार मोटे नंदकुमार मोटे बाबू मोटे साहेबराव चंदनशिवे भिकाजी खरात अमित वाघमारे अमित ऐवळे अमर मोटे मोहन खरात दत्तात्रेय ऐवळे सोमनाथ तोरणे शुभम सरतापे सुहास खरात सूर्यकांत खरात महेश ऐवळे ताजुद्दीन झारी सोमनाथ ऐवळे मारुती ढोबळे विशाल काटे नामदेव खरात विनायक ऐवळे किशोर लांडगे महेश चव्हाण अविनाश रणदिवे अनिल घारगे आकाश तोरणे सुश्मिता मोटे सुशीला भिसे व इतर अनोळखी 20 ते 25 जण अशा लोकांवर आटपाडी पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे पोलीस उपनिरीक्षक सागर खाडे यांनी पोलिसात फिर्यादी दिली आहे
Post a Comment
0Comments