पोलिसांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मध्यरात्री हटवला

Admin
By -
0

 आटपाडी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे काल मध्यरात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला. याबद्दल जिलेबी वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. परंतु हा आनंद औटघटकेचा ठरला. सर्व भीम अनुयायी झोपत असतानाच पोलिसांनी मध्यरात्री पुतळा काढून घेतला. सदरची घटना समजताच मोठ्या संख्येने भीमसैनिक व भीम अनुयायी यांनी ठीक मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

आटपाडी शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे. परंतु शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नसल्यामुळे भीमसैनिकांमध्ये नाराजी होती. अशा परिस्थितीत, शहरात पुतळा उभारण्याची मागणी विविध संघटनाकडून होत होती.
परंतु याकडे जाणीवपूर्वक प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आंबेडकर अनुयानांकडून केला जात होता. त्यामुळे शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचा पुतळा कधी उभा राहणार? हा प्रश्न नेहमी उपस्थित केला जात होता.आंबेडकर प्रेमींनी शनिवारी आटपाडीचा आठवडा बाजार र असताना पहाटे पुतळा बसवला दिवसभर यापुतळ्याभोवती कार्यकर्त्यांचा नी ठाण  ,मांडले पोलीस व प्रशासनाने कायदेशीर मंजुरी घेऊन पुतळा उभा करावा असे सांगितले परंतु कार्यकर्ते ऐकण्याची मनस्थितीत नव्हती त्यामुळे पोलिसांनी विसर पडून देऊन मध्यरात्री पुतळा काढला 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)