गलाई समाचार" आटपाडी तालुका वाशीयांचा आत्मा बनावा .

Admin
By -
0


आटपाडीकरांनो !, तुम्ही !, मालक, कर्ते, नेते, विश्वस्त आहात हे विसरू नका .

गलाई समाचार" आटपाडी तालुका वाशीयांचा आत्मा बनावा .

सादिक खाटीक

आटपाडी दि. ११ ( प्रतिनिधी )

     जगभरात विखूरलेल्या आणि येथे वास्तव्यास असणाऱ्या आटपाडी तालुका वाशीयांनो !, तुम्ही !, आटपाडी तालुक्याचे, मालक, कर्ते, नेते, विश्वस्त आहात, हे विसरू नका,* अशी अंतरीची हाक देत, *गलाई समाचार !, सारे जहाँतल्या आटपाडी तालुका वाशीयांचा आत्मा बनावा !* अशी भावना ज्येष्ट पत्रकार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी व्यक्त केली .

          संपादक तुकाराम गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली प्रकाशीत होत असलेल्या गलाई समाचार या पाक्षिकाचा २५ वा वर्धापन दिन आणि गलाई समाचार या युट्यूब चॅनेलचा प्रथम वर्धापन आणि तुकाराम गिड्डे यांचा वाढदिवस या निमित्ताने हॉटेल उदयराज येथे आयोजित कार्यक्रमात सादिक खाटीक बोलत होते .

          सन्माननीय अतिथी म्हणून तहसीलदार सागर ढवळे, पोलीस फौजदार एस . डी . खाडे, पोलीस फौजदार ए .बी .खरात, आटपाडी तहसील कार्यालया मधील सहाय्यक महसुल अधिकारी शफिया जमादार, महसुल सहाय्यक अजय ऐवळे, तंत्रज्ञान सहाय्यक योगीराज वाघमारे, जितेंद्र गिड्डे, बाळासाहेब हसबे, अॅड. श्रीनिवास पाटील, संतोष मगर, असिफ इनामदार,  मोहन बागल, अब्दुल रहिमान शेख, उपसंपादक मयुर गिड्डे, ज्येष्ट पत्रकार सतिश भिंगे, अंकुश मुढे, महादेव लांडगे, दत्तात्रय मोकाशी, राजु शेख, अल्लाउद्दीन मुलाणी, इंजिनियर महेश पाटील, रमेश टकले पेंटर इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते . 

           विविध क्षेत्रात नावीण्यपूर्वक कामगिरी करणारे सर्वश्री पंढरीनाथ नागणे, संजय जरे, संजय फुले शंकर ढोले, जगन्नाथ लोखंडे, संभाजी देशमुख, बाळासाहेब करचे, तात्यासाहेब व्हणमाने, रमेश चव्हाणसुभाष गायकवाड,महेशकुमार पाटील, पांडुरंग नांगरे, नारायण सरगर, सुधीर पाटील यांचा स्मृतिचिन्ह शाल, देवून सन्मान करण्यात आला .

          प्रारंभी गलाई समाचारचे संपादक तुकाराम गिड्डे यांनी स्वागत केले . प्रास्ताविक रमेश टकले यांनी केले . यावेळी शफीया जमादार, इंजिनियर महेशकुमार पाटील शुभेच्छा देणारी भाषणे झाली .

          सादिक खाटीक पुढे म्हणाले, अत्यंत सामान्य उपेक्षित कुटूंबातल्या तुकाराम गिड्डे यांनी वृतपत्र क्षेत्रात २५ वर्षे टिकून राहण्याचे मोठे काम केले आहे . पत्रकारीतेचे क्षेत्र अत्यंत खडतर कठीण त्रासदायक असे क्षेत्र आहे . यात समाजाची बांधीलकी असणारी संयमीच व्यक्ती टिकु शकते .या विचारातून तुकाराम गिड्डे वाट चालताहेत, हे प्रशंसनीय आहे .

          १४० वर्षापासून आटपाडी तालुक्याच्या उशाला असणाऱ्या, राजेवाडी तलावाचे पाणी मिळू न शकल्याने आटपाडी तालुक्यातील ६ - ७ पिढ्यांची अक्षरशः माती झाली . देश, राज्य, विभाग, जिल्हास्तरीय सत्तेत फारसे प्रतिनिधीत्व न मिळालेल्या आटपाडी तालुकाच्या वाट्याला आमदार, खासदार, नामदारकीच्या अनुषंगाने मोठी परवड आली . अशा विकासाच्या अनेक महत्वपूर्ण बाबीत आपण सर्वांनी बघ्याची भूमिका घेतल्यानेच आटपाडी तालुका ५० वर्षे विकासाच्या दृष्टीने मागे पडला आहे .मोठी दयनीय अवस्था बहुतांश आटपाडी तालुका वाशीयांची झाली आहे. हे सर्व आटपाडी तालुकावाशीय, आपणच या तालुक्याचे नेते, विश्वस्त, मालक, कर्ते आहोत हे विसरून, शतकापासूनचा अन्याय सोसत आले आहेत . या उदासीनतेमुळे या सहा पिढ्यातल्या हजारो कुटुंबांना आटपाडी तालुका सोडून अन्यत्र स्थलांतरीत व्हावे लागले . हमाली, गिरणी कामगार, उसतोडी, मेंढपाळी, बहुरुपी, इत्यादी अनेक जगण्याचे मार्ग धुंडाळत हे आटपाडीकर तालुका सोडून देशभर विखुरले गेले .

          क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी, डॉ . भारत पाटणकर यांची ३२ वर्षे सुरु असलेली पाण्याच्या  चळवळीच्या पायाचे दगड बनण्याचे भाग्य माझ्यासह अन्य आटपाडीकर पत्रकारांना लाभले . महापुरात नद्यांचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी तालुक्यांना द्या, म्हणून ९ ऑगस्ट क्रांतीदिनी आवाज उठविणारे आम्ही आटपाडी तालुक्यातील ५० - ६० पत्रकारच होतो . आटपाडी तालुक्याच्या प्रत्येक महत्वाच्या प्रश्नांवर तालुक्यातील पत्रकारांनीच मोठा आवाज उठविला आहे . मात्र हे आपले काम नव्हे, अशीच बघ्याची भूमिका घेणाऱ्या बहुसंख्य आटपाडी तालुका वाशीयांच्या मानसिकतेचा अनेकांनी फायदा घेतला . या विचार, मानसिकतेने आटपाडी तालुका सर्व बाजूंनी ५० वर्षे मागे पडला आहे . आता तरी प्रत्येकाने जागृत व्हावे, डोळस व्हावे . असे स्पष्ट करून सादिक खाटीक यांनी, राजेवाडी तलावाचा प्रश्न, माणदेश जिल्ह्याचे ठिकाण आटपाडी व्हावे हा प्रश्न, आटपाडी मार्गे कराड - पंढरपुर आणि बारामती - विजयपूर या नवीन रेल्वे मार्गांचा प्रश्न इत्यादी अनेक प्रश्नांवर आटपाडी तालुका वाशीयांनी क्रांतीचे शस्त्र हाती घेत पुढे येणे अत्यंत गरजेचे असल्याचेही शेवटी सादिक खाटीक यांनी स्पष्ट केले अशोक पवार यांनी आभार मानले .

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)