सांगली येथे आज ग्रंथउत्सवास प्रारंभ होणार आहे सोमवारी व मंगळवार या दोन दिवस होणाऱ्या ग्रंथोत्सवाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती सांगली जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांनी दिली सांगलीतील स्टेशन चौकातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय जवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून ग्रंथ दिंडीस प्रारंभ होणार आहे या ग्रंथ दिंडीचे उद्घाटन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते होणार आहे सकाळी आठ वाजता दिंडीचा प्रारंभ होईल काँग्रेस भवन राम मंदिर चौक ,कच्ची जैन भवन पर्यंत ग्रंथ दिंडी नेण्यात येणार आहे जिल्हा कोषाधिकारी सुरेखा जाधव व जिल्हा माहिती अधिकारी संपदा बिडकर या ग्रंथ दिंडीत सहभागी होणार आहे राज्याचे शिक्षण मंत्री व पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते सांगली ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे ,जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ समीक्षक अविनाश सप्रे कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे आहेत,जिल्ह्यातील खासदार आमदार राज्याचे प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर सह,संचालक शालिनी इंगोले जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडभिसे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे सांगली जिल्हा संघाचे अध्यक्ष एकनाथराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती आहे 24 व 25 फेब्रुवारी दोन दिवस चालणाऱ्या ग्रंथ महोत्सवानिमित्त ग्रंथ प्रदर्शन व्याख्यान विविध चर्चासत्र सकाळी दहा ते पाच यावेळी होणार आहे जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी कर्मचारी प्रकाशक लेखक साहित्यिक जिल्ह्यातील विविध अधिकारी वक्ते यात सहभागी होणार आहे
सांगलीत आज होणाऱ्या ग्रंथउत्सव तयारी पूर्ण
By -
February 23, 2025
0
Post a Comment
0Comments