प्राचार्य श्री शहाजी डोंगरे यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड

Admin
By -
0


 मा प्राचार्य श्री शहाजी डोंगरे यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड

सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी श्री शहाजी डोंगरे यांची निवड करण्यात आली आहे. २२ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शहाजी डोंगरे हे राजेवाडी गावचे रहिवासी असून त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. ‘कमवा आणि शिका’ योजनेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण घेतले. आपल्या कठोर परिश्रमाच्या बळावर त्यांनी रयत शिक्षण संस्थेत डी. एड. कॉलेजचे प्राचार्य म्हणून यशस्वी कार्यभार सांभाळला आणि संस्थेचे आजीव सदस्यत्व प्राप्त केले.संस्थेने त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत त्यांची ऑडिटर पदावर निवड केली. या पदावर उल्लेखनीय कार्य केल्यामुळे त्यांच्यासाठी विशेषतः ‘ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी’ (ओएसडी) हे पद निर्माण करण्यात आले, जिथे त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली.

 सेवानिवृत्ती नंतरही त्यांनी ओएसडी म्हणून अतिशय उत्तम कामगिरी केली. त्यामध्ये विशेषतः शासकीय पातळीवरील कामाचा निपटारा करण्यासाठी खास करून प्रयत्न केले. अतिशय प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, संस्थानिष्ठ व सेवकांना अडचणीत सहकार्य करणारे म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा अनुभवी, कुशल प्रशासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तिची रयतच्या जनरल बाॅडी सदस्य पदी निवड झाली त्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)