खरसुंडी येथील सिद्धनाथाची 25 एप्रिल रोजी सासनकाठी यात्रेनिमित्त नियोजन बैठक

Admin
By -
0

. आटपाडी खरसुंडी  श्री सिद्धनाथ चैत्र यात्रे बाबत प्रांताधिकारी यांच्या उपस्थित बैठक , बैठकीत मूळ प्रश्नांना बगल देण्याचा प्रकार .

खरसुंडी ता. आटपाडी येथील श्री सिद्धनाथांच्या चैत्र यात्रेत ता. २५ रोजी सासणकाठी व पालखी सोहळा संपन्न होत आहे. या अनुषंगाने आज प्रांताधिकारी विक्रम बादल यांच्या उपस्थितीत विविध विभागांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती . देवस्थान सभागृहात झालेल्या या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील , तहसीलदार सागर ढवळे , पोलीस निरीक्षक विनय बहीर , देवस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी ,सरपंच धोंडीराम इंगवले ,उपसरपंच राजाक्का कटरे , बाजार समिती चे सभापती संतोष पुजारी तसेच विविध विभांगांचे खाते प्रमुख , ग्रामपंचायत सदस्य, देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, ग्रामस्थ व मानकरी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये प्रामुख्याने सासणकाठी व पालखी मिरवणूक तसेच यात्रेच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी व उपाययोजनां बाबत ठोस चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाच्या विविध विभागांनी प्रती वर्षी प्रमाणेमागील पानावरून पुढे केलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण केले मात्र त्याच्या अंमलबजावणी व यशस्वीता याबाबत विस्तृत चर्चा झाली नाही . त्यामुळे अतिक्रमण , पार्किंग ,पर्यायी मार्ग , व मुख्य सोहळ्या वेळी होणारी गर्दी व चेंगराचेंगरी याबाबत ठोस कृती आराखडा बैठकीत तयार झाला नाही .

बैठकीच्या सुरवातीस ग्रामविकास अधिकारी कामेश्वर आयवळे यांनी स्वागत करून यात्रेच्या अनुषंगाने ग्रामपंचायत प्रशासनाने केलेल्या तयारी बाबत माहिती दिली . त्यामध्ये यात्रा कालावधीत जागा वाटप . सी .सी.टी.व्ही . पिण्याचे पाणी , पर्यायी मार्ग या तयारीची माहिती दिली . देवस्थान समितीच्या वतीने अध्यक्ष चंद्रकांत पुजारी यांनी मंदिरातील दर्शन व्यवस्था , सुरक्षा रक्षक ,वीज पाणी या बाबत पूर्ण तयारी झाल्याचे सांगितले . तालुका आरोग्य अधिकारी साधना पवार यांनी यात्रेमध्ये केलेल्या आरोग्य विषयक उपाययोजनां बाबत माहिती दिली . आटपाडी आगार व्यवस्थापक राहुल देशमुख यांनी एस .टी. वाहतुकी बाबत माहिती दिली . त्याचबरोबर अन्य विभागांनी आठावा सादर केला .

यावेळी विठ्ठलापूर येथील बाड मानकर्यांनी त्यांची नैवेद्य करण्याची पूर्वपार जागे बाबत समस्या मांडली याबाबत स्थानिक देवस्थान समिती व मानकरी यांच्यात चर्चा होवून तोडगा काठण्यात आला . ग्रामपंचायत सदस्य विक्रम भिसे यांनी बाळेवाडी रस्त्यावर असणाऱ्या समस्यांबाबत प्रश्न मांडले . वेजेगाव येथील ग्रामस्थांनी मुख्य सोहळ्या वेळी पालखीच्या पुढे असणाऱ्या अश्व व गाय यामुळे सासणकाठीच्या मार्गात अडचणी येत असल्याचे सांगितले . शिवसेना तालुका प्रमुख शेखर निचळ यांनी यात्रेच्या अनुशंगाणे ग्रामपंचायत व देवस्थान ट्रस्ट यांचेकडून होणाऱ्या उपाययोजनां बाबत नाराजी व्यक्त करीत संबधीत यंत्रनेस सूचना देण्याची मागणी प्रशासनाकडे केली .यावेळी विविध गावचे मानकरी ,ग्रामस्थ उपस्थित होते .

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)