खरसुंडी श्री सिद्धनाथ देवस्थान ची यात्रा 25 एप्रिल रोजी सासनकाठी सोहळा

Admin
By -
0




 महाराष्ट्राचा कर्नाटका प्रसिद्ध असलेल्या खरसुंडी  येथील श्री सिद्धनाथ देवस्थानची सासनकाठी यात्रा सोहळा 25 एप्रिल रोजी होणार आहे या यात्रेसाठी लाखो भाविक खरसुंडी तालुका आटपाडी दरवर्षी चैत्र महिन्यात जमत असतात या यात्रेची तयारी पूर्ण झाले आहे श्री सिद्धनाथ देवस्थान ग्रामपंचायत खरसुंडी कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी यात्रा पार पडावे यासाठी नियोजन केले आहे यात्रेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे यात्रेसाठी लाखो भाविक एसटी बस ट्रक टेम्पो चार चाकी वाहने रिक्षा मोटरसायकल बैलगाडी सायकल आदि वाहनातून व पायी चालत खरसुंडी येथे येऊ लागले आहेत गेली तीन दिवस यात्रेनिमित्त मानदेशातील खिलार जातिवंत जनावरांचा बाजार भरला आहे हजारो जनावरे खरेदी विक्रीसाठी शेतकरी व्यापारी दलाल यांनी आणली आहेत खरसुंडीतील घाणद रस्ता कडेला जनावरांचा बाजार भरला आहे या जनावरांची वाहतूक करण्यासाठी शेकडो वाहने ये जा करीत आहेत जनावराची खरेदी विक्री करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती नेकार्यालय सुरू केले आहे चैत्र महिन्यात भरणारी मानदेशातील ही मोठी यात्रा आहे जातिवंत खिलार खोंड या यात्रेतील प्रमुख आकर्षण असते त्याच्या खरेदी विक्रीसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र गुजरात राज्यातून शेतकरी व्यापारी दलाल आले आहेत लाखो रुपयाचीउलाढाल जनावरांच्या खरेदी विक्रीतून होत आहे 60हजाल पासून साडेतीन लाखापर्यंतच्या किमती खोंडंच्या आहेत यात्रेसाठी जादा एसटी बसेसची जिल्ह्यातील अनेक एसटी बस स्थानकातून करण्यात आले आहे यात्रेनिमित्त विविध स्टॉल मांडले आहेत मंदिर परिसरात सासन काट्या घेऊन भाविक जमू लागले आहेत नैवेद्य दाखवण्यासाठी दर्शनासाठी मंदिरात गर्दी होत आहे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेत

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)