जलव्यवस्थापन कृती पंधरवडा अंतर्गत
जलसंपदा विभागामार्फत कृत्रिम बुध्दीमत्ता प्रशिक्षण
सांगली, : कृत्रिम बुध्दीमत्ता (AI) या नवीन तंत्राज्ञानाचा वापर योग्य पध्दतीने केला तर किमान संसाधनात जास्तीत जास्त परिणाम मिळू शकतो व प्रशासनात कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करुन प्रशासन अधिक गतिमान व कार्यक्षम करणेचे शक्य आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग विभागामार्फत “जलव्यवस्थापन कृती पंधरवडा” अंतर्गत कृत्रिम बुध्दीमत्तेचा शासकीय कामकाजात वापर या विषयी पाटबंधारे भवन सांगली येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणाकरीता वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली च्या प्रा. डॉ. शर्वरी सोलापुरे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
या प्रशिक्षणास सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता सर्वश्री रोहित कोरे, महेश रासनकर, अमर सुर्यवंशी, उपअभियंता मोहन गळंगे, बाबासाहेब पाटील, मनोज कर्नाळे, शिवाजी पाटील, राकेश बन्ने, शर्वरी पवार, सचिन नाईक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या प्रशिक्षणामध्ये कृत्रिम बुध्दीमत्तेचा शासकीय कामकाजात वापर व त्याचा भविष्यकाळात होणारे लाभ याबद्दल प्रा. डॉ. शर्वरी सोलापुरे यांनी मार्गदर्शन केले. प्रशासनात कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सल, पॉवरपॉईंट, आऊटलुक यामध्ये कसा करता येईल याबाबतचे प्रशिक्षण दिले. त्याचबरोबर Chat GPT या तंत्रज्ञानाबाबत प्रा. सोलापुरे यांनी माहिती दिली.
या कार्यक्रमाचे नियोजन टेंभू विभागाचे कार्यकारी अभियंता अभिनंदन हरुगडे यांनी केल
Post a Comment
0Comments