माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख व युवा नेते अनिल शेठ पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांच्या हस्ते पक्षप्रवेश

Admin
By -
0



 सांगली जिल्ह्यातील माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख माजी आमदार शिवाजीराव नाईक माजी आमदार विलासराव जगताप तमन्न गोंडा रवी पाटील  जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज मुंबई येथे प्रवेश केला उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार प्रफुल पटेल प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थि त कार्यक्रम झाला इस्लामपूर चे माजी नगराध्यक्ष शशिकांत दादा पाटील यांनी प्रास्ताविक केले यावेळी प्रमुख व्यक्तींची भाषणे झाली आटपाडी तालुक्यातून भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल शेठ पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला त्यांचा सत्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला अनिल पाटील यांनी भाजप पक्षाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता तर माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती ते या निवडणुकीत पराभूत झाले होते विधानसभा निवडणूक निकालानंतर जिल्ह्यातील नेते व कार्यकर्त्यांनी भाजप पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला होता लवकरच सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यक्रम घेतला जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगले करण्याच्या दृष्टीने पक्षप्रवेश झाला

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)