जम्मू-काश्मिरहून परतलेल्या पर्यटकांशी
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी साधला संवाद
सांगली, पहलगाम काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दुर्घटनेच्या अनुषंगाने जम्मू काश्मीर येथे अडकलेले 15 पर्यटक सांगली जिल्ह्यात दि. 25 एप्रिल रोजी सुखरूपपणे परतले. यापैकी काही पर्यटकांशी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी संवाद साधला.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांनी पर्यटकांशी समन्वय साधून जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांची माहिती दिली. त्यानुसार प्रमोद जगताप, फुलचंद शिंदे व त्यांचे कुटुंबीय यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज संवाद साधून घटनेबाबत सविस्तर माहिती घेतली. प्रमोद जगताप, फुलचंद शिंदे यांनी जिल्हा प्रशासन सातत्याने संपर्कात होते याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
दरम्यान सांगली जिल्ह्यातील 66 पर्यटक काश्मीर येथे अडकले असल्याची प्राथमिक माहिती दि. 25 एप्रिल 2025 रोजीचे सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्हा नियंत्रण कक्षास प्राप्त झाली आहे. त्यामधील 24 पर्यटक सुखरूपपणे जम्मू काश्मीर बाहेर पडले आहेत. यातील 15 पर्यटक सांगली जिल्ह्यात पोहोचले असल्याची माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
Post a Comment
0Comments